धक्कादायक! कामाच्या शोधात शिवनीवरून कोराडीला आली, पतीच्या मित्रांनीच केला अत्याचारमध्य प्रदेशातील शिवनी येथून एक महिला कामाच्या शोधात कोराडी येथे आली. येथे काही नराधमांनी तिचा गैरफायदा घेतला. पहिल्यांदा नातेवाईकाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पतीच्या मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळं ती महिला परत शिवनीला गेली. तिथल्या शिवनी पोलिसांत तक्रार दाखल केली. परंतु, प्रकरण कोराडीचे असल्यानं ते प्रकरण कोराडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

 शिवनी जिल्ह्यातील एका गावातील महिला आपल्या पतीसोबत कामासाठी कळमेश्वरला आली. दोन डिसेंबर 2021 ला त्यांनी बांधकाम मजूर म्हणून काम केले. तिची एका झोपडपट्टीत नातेवाईकाकडे राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तिचा नवरा वर्धा येथे काम करत होता. सहा डिसेंबर 2021 रोजी कृष्णा देहरिया (वय 40) याने संबंधित महिलेवर अत्याचार केला. पती परतल्यानंतर तिने आपबिती सांगितली. परंतु, त्यानेही तिच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. ठेकेदाराला ही बाब कळल्यानंतर त्याने तिला कोराडी येथे 16 डिसेंबर 2021 रोजी पाठविले.

Post a Comment

0 Comments