"१७ कोटीच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे आमदार जेलमध्ये जाणार"



शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी 'शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका आघाडीचा धर्म पाळा. टक्केवारी घेणं आणि १७ कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेल मध्ये जाणार आहे' असा थेट इशाराच दिला आहे. बीडमध्ये आयोजित शिवसेना प्रवेशाच्या जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवरच जोरदार हल्लाबोल केला. याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उपस्थिती होती. बीडमध्ये  गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटला आहे.

महाआघाडीच्या इतर नेत्यांना इशारा देत आपण आघाडीमध्ये आहोत आपापसात मतभेद करायचे नाहीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही. महाविकास आघाडीत आम्ही देखील आहोत, त्यामुळे कुठलाही शिवसैनिकावरील अन्याय सहन केला जाणार नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी बजावून सांगितलं. आम्ही फक्त शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाची वाट बघतो असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Post a Comment

0 Comments