नारायण राणेंच्या 'या' ट्विटने खळबळ


शरद पवारांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दोन्ही पुत्रांवर गुन्हा दाखल झाला. या कारवाईवरून नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला. नारायण राणे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, जनता किंवा विरोधक यांच्या टीकेचे खंडन करणे, हे सत्तारूढ पक्षाचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणे, याला सत्तेचा दुरुपयोग म्हणतात. केंद्र सरकारच्या व्होरा समितीचा निकाल राज्य सरकारने मागवावा. त्यात कळेल कोणाचे दाऊदशी संबंध आहेत, असा खळबळजनक दावा राणे यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Post a Comment

0 Comments