लातुर ते खांडवी रस्त्यावर अज्ञात चोरट्याने पळवली बॅग; २१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास


बार्शी/प्रतिनिधी:

लातूर ते खांडवी रस्त्यावर ट्रॅव्हल्स मधून प्रवास करताना विविध वस्तू असणारा एकवीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधना सचिन जाधव (वय ३०) रा. चिलवडी,जिल्हा उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्रौ साडे दहा वाजल्या पासून ते दि.१ मार्च रोजीच्या मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान लातुर ते खांडवी,ता.बार्शी जाणार्‍या रोडच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीने स्वता : चे फायद्याकरिता अमृता ट्रॅव्हल्स बस नंबर एम एच २४ ए बी ६१६१ चे पाठीमागील डिक्कीमधुन फिर्यादीच्या  संमतीशिवाय बॅग चोरून नेले आहे.बॅगेतील २१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.म्हणून अज्ञात आरोपी विरुध्द भादवि कलम ३७९  नुसार बार्शी पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालभार वाघमोडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments