बार्शी पोलिसांच्या कामगिरीवरून देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर बरसले


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यातील अवैद्य धंदे यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यावरूनच आता त्यांचे सुपुत्र रणवीर राऊत यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतवण्याची धमकी पोलीस प्रशासनाकडून देत असल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले आहे.

बार्शी चे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी गेल्या आठवड्यात बार्शी तालुक्यातील राजरोसपणे चालणारे अवैद्य धंदे बाबत विधानसभेच्या प्रश्न उत्तरच्या तासाला प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लक्ष देण्याचे आवाहन केले. होते बार्शी आमदार राजेंद्र राऊत व बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या वारंवार खडके उडताना दिसून आले आहेत.

आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणवीर राऊत यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची धमकी सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून देत असल्याचा आरोप रणवीर राऊत यांनी केला आहे, त्यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले लोकप्रतिनिधी जर विधानसभेत बोलणार असतील आणि त्या संदर्भात जर प्रशासनातील अधिकारी त्यांच्यावर दुग करणार असतील विधानसभेत बोलायचे काय हा प्रश्न निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सोलापूर ग्रामीण पोलिसांना ही विधानसभेत धारेवर धरले यामुळे आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा जीव धोक्यात आहे, त्यासंदर्भात पत्रही देण्यात आले मात्र त्यावर कोणतीही कारवाई होणार नाही याची जाणीव असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले असेच सुरू राहिले तर भाजपकडून बार्शी शहर पोलिसांना घेराव घालण्याचा इशारा हि देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments