सांगोला/प्रतिनिधी:
सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथे जनावरे शेतात गेल्याच्या कारणावरून वृद्धास काठीने मारून जखमी केले. शेतात जनावरे पुन्हा आली तर बघून घेईल असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वृद्ध वडीलाच्या मुलाने सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आबासाहेब सावंत असं जखमी वृद्धाचे नाव आहे.
गायगव्हाण येथील घरात वडील आबासाहेब आणि मुलगा पांडुरंग हे जेवण करत होते. संतोष रामचंद्र कांबळे याने जनावरांना काठीने मारायला सुरुवात केली. जनावरे ओरडल्याचा आवाज ऐकून वडील मुलगा घराच्या बाहेर आले असता, तुझी जनावरे आमच्या शेतात आली असे म्हणत सावंत यांना दमदाटी केली. आमची जनावरे कोठेही गेले नाहीत खात्री करा. असे म्हटल्यावर संतोष कांबळे याने चिडून त्याच्या हातातील काठीने आबासाहेबांना मारहाण केली. पुन्हा जनावरे आली तर जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी संतोष कांबळे या इसमावर गुन्हा नोंद केला आहे.
0 Comments