बार्शी ! भालगाव येथे ऊसाचे पाचुट जाळत असताना ; द्राक्ष बागेचे चार ते पाच लाखाचे नुकसान



बार्शी तालुक्यातील भालगाव येथे उसाचे पाचट जाळत असताना द्राक्ष बागेतील पाच मोठ्या द्राक्षे बागेच्या लाईनी व दोन छोट्या लाईनी मधील अंदाजे 400 ते 450 द्राक्षेची झाडे व त्यांना लागलेली दाक्षे, ठिंबक पाईप, व द्राक्षे झाडाला लावलेले वेळु असे जळालेले दिसले व असे मिळुन आमचे बागेतील एकुण अंदाजे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत पांडूरंग जयवंत दराडे वय- 40 रा. भालगाव, ता. बार्शी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यांच्या फिर्यादीनुसार एकावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधी सविस्तर ओळख सविस्तर असे की, 24 मार्च रोजी सायंकाळी 07/00 वा.चे सुमारास आरोपी नामे 1) निलकंठ आप्पाराव पाटील रा. भालगाव ता. बार्शी याने त्याचे आमचे बागेशेजारी असणारे त्याचे शेतातील तुटुन गेलेल्या उसाचे पाचुट पेठवल्यास आमचे बागेतील पाचुट पेटुन नुकसान होईल याची कल्पना असताना देखील तसेच त्याने कोणतीही दक्षता न घेता उसाचे पाचुट पेटवुन दिले त्यामुळे आमचे बागेत आग लागुन माझे बागेतील पाच मोठ्या द्राक्षे बागेच्या लाईनी व दोन छोट्या लाईनी मधील अंदाजे 400 ते 450 द्राक्षेची झाडे व त्यांना लागलेली दाक्षे, ठिंबक पाईप, व द्राक्षे झाडाला लावलेले वेळु असे जळालेले दिसले व असे मिळुन आमचे बागेतील एकुण अंदाजे 4 ते 5 लाखांचे नुकसान होणेस कारणीभुत झाला आहे. त्यानंतर मी त्यास त्याबाबत विचारले असता त्याने मला शिवीगाळ दमदाटी केली गुन्हा घडले नंतर तात्काळ पोलीस ठाणेस येवुन तक्रार द्यावी परंतु गावातील काही लोकांनी आमचा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही ऐकत नसल्याने मी आज रोजी उशीराने तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणेस आलो आहे.

Post a Comment

0 Comments