बार्शीत माजी नगरसेवकाला खंडणी मागून मारहाण


बार्शी  येथील माजी नगरसेवक सोमनाथ रमाकांत पिसे यांना महिन्याला  वीस हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करत बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ रमाकांत पिसे हे ११ मार्च रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास, तेलगिरणी चौकातील सुभाष कवडे यांच्या चहाच्या टपरीवर उभा असताना, आरोपी प्रवीण नवनाथ रिकीबे उर्फ (बच्चन) व विकी डबडे या दोघांनी मिळून येऊन, 'मी मानवी अधिकार याचा अध्यक्ष आहे'. तू बार्शीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मालमत्ता तयार केली आहे असे म्हणत जबर मारहाण केली. पिसे यांना मारहाण करून, तुझा खोटा व्हिडीओ तयार करून, फेसबुकला टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. महिन्याला वीस हजार रुपये हप्ता म्हणून द्यायचे आणि नाही दिले तर तयार केलेला व्हिडिओ फेसबुकला टाकून, कुठेतरी नेऊन मारून टाकीन. याआधी एक खून पचवीला आहे असं म्हणत,  वीस हजार रुपयाची मागणी करत, आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

वरील आरोपींवर बार्शी भादवी कलम ३८७,३२३,५०४,५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments