वैराग! शेतातील लाईट जंप का तोडली विचारले म्हणून दोघाला डोळ्यात चटणी टाकून मारहाण


 
फिर्यादी कृष्णदेव तुकाराम जाधव (वय 35) रा.झरेगाव ता.बार्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार एक मार्च रोजी  रात्री राघुचीवाडी येथे असताना माझा लहान भाऊ नामे विठ्ठल तुकाराम जाधव याने मला फोन करुन सांगितले की,आपले शेत शेजारी इसम नामे 1) अविनाश शिवाजी जाधव 2) गणेश शिवाजी जाधव यांनी मला शेतातील लाईटचे तारेवरील जंप का तोडली आमचे कडील लाईट का बंद केली आहे, असे मी त्यांना झरेगाव चौकात विचारले असता त्यांना मला शिवीगाळ करुन खाली पाडुन अविनाश जाधव यांने त्याचे हातातील दगडाने माझे तोंडावर व डोकीत मारहाण करुन दुखापत केली आहे.

शिवाजी जाधव यांने मला लाथाबुकक्यांनी मारहाण छातीत पोटावर अवघड जागेवर केले आहे.असे माझा भाऊ विठ्ठल जाधव याने सांगितलेवरुन मी दि.01/03/2022रोजी सकाळी 09/30वा.मौजे झरेगाव येथे केसरे गल्लीत जावुन माझा भाऊ नामे विठ्ठल जाधव यास मारहाण करणारी इसम नामे 1) अविनाश शिवाजी जाधव 2) गणेश शिवाजी जाधव यांना का माझा भाऊ विठ्ठल जाधव यास मारहाण केली असे त्यांना विचारले असता त्याचा राग इसम नामे 1) अविनाश शिवाजी जाधव 2) गणेश शिवाजी जाधव 3) कवीता शिवाजी जाधव 4) श्वेता अविनाश जाधव सर्व रा.झरेगाव ता.बार्शी 5) कवीता जाधव यांची लग्न झालेली लहान मुलगी शितल रा. नांन्नज हल्ली मुक्काम झरेगाव ता.बार्शी असे मिळुन माझे व माझा भाऊ विठ्ठल यांचे अंगावर शिवीगाळ करत येवुन अविनाश जाधव याने लाथाबुकक्यांनी मारहाण करुन मला धरुन माझे डावे हाताचे दंडास चावुन जखमी केले व गणेश जाधव याने त्याचे हातातील ब्लेडने माझे डावे हाताचे मनगटाने वर मारुन जखमी केले आहे.माझा भाऊ विठ्ठल यास कविता जाधव व श्वेता जाधव यास धरुन लाथाबुकक्यांनी मारहाण केली कविता जाधव यांची मुलगी शितल हिचे हातातील लाल रंगाची चटणी माझे व माझा भाऊ विठ्ठल जाधव यांचे डोक्यावर तोंडावर व अंगावर टाकली त्यामुळे डोळ्यात आग झाली तेव्हा माझा भाऊ विठ्ठल जाधव यांचे पँन्टचे खिशातील पाच हजार (5000/-) रुपये कविता जाधव हिने काढुन घेतले व माझा भाऊ विठ्ठल जाधव याचे उजवे हाताचे बोटातील  आरद्या तोळ्याचे सोन्याची अंगठी श्वेता जाधव हिने काढुन घेतली आम्हाला मारहाण करताना वरील लोक म्हणत होते तुम्हाला एकटे एकटे गाटुन जिवे मारहाण करण्याची धमकी दिली आहे. या गुन्ह्याचा जबाब उस्मानाबाद मध्ये नोंदवण्यात आला होता परंतु गुन्हा वैराग हद्दीत घडल्यामुळे त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments