महिलेस दमदाटी व विनयभंग केल्याप्रकरणी काँग्रेसचे बार्शी शहराध्यक्ष आरगडे यांच्यावर गुन्हा दाखल



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष ऍड. जीवनदत्त आरगडे यांच्यावर महिलेस दमदाटी व विनयभंग केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, दि.८ मार्च २०२२ रोजी महिला दिनी जीवनदत्त आरगडे यांनी त्यांच्या फेसबुक या सोशल मिडियावरून एका महिलेस तू पोलिसांच्या बाजूने मोर्चा काढल्याबद्दल हिनवत होते.त्यावर त्या महिलेने मी आज " मी आज महिलादिन असल्याने मी आज काही बोलत नाही बाळा , उद्या सांगते ".अशा पद्धतीची कमेंट्स केली होती.त्यावर आरगडे यांनी कमेंट्सला प्रत्युत्तर देताना म्हटले की , तुला वाटते मी तुला काही बोलत नाही,तू मला इथून पुढे डिवचून बघ,मग बघ तुझी फटफझीती कशी करतो ते,तुझे इतके किस्से आहेत की पुन्हा तोंड दाखवायच्या लायक राहणार नाहीस असे प्रत्युत्तर फेसबुक कमेंट्सवर त्या महिलेस देत आरगडे यांनी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची कृती करून महिलेस दमदाटी व विनयभंग केल्याप्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष जीवनदत्त आरगडे यांच्या विरोधात भादंवि कलम - ५०९,५०६,५०० व अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 92A,92B,89  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments