सोलापूर! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करा


महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ऐकेरी भाषा वापरून केलेल्या अवमान व त्यामुळे निर्मांण झालेल्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नांबाबत राज्यपाल कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रारी अर्ज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी जेलरोड पोलिस स्टेशन येथे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना दिला आहे. 
         
जेलरोड पालिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बजरंगी साळुंखे यांना दिलेल्या तक्रारी अर्जात मी विष्णु विठ्ठल कारमपुरी शिवसैनिक व शिवप्रेमी मावळा असून महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहराचा रहिवासी आहे. मी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरूध्द तक्रारी अर्ज देतो की, त्यांनी औरंगाबाद येथील एका जाहिर कार्यक्रमात महाराष्ट्राचे जाणते राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजादी राज छत्रपती शिवाजी महाराज यांचा बद्दल ऐकेरी भाषा वापरून एक थोर महान इतिहासिकार व आमचे श्रध्दास्थान असलेले पराक्रमी राजाचा अपमान केला आहे. त्याच बरोबर संपूर्ण महाराष्ट्र, हिंदुस्थान आणि जगातील शिवप्रेमीचे भावना दुखावल्या आहेत. त्याच बरोबर या वक्तव्यामुळे सोलापूरसह संपुर्ण महाराष्टात शांतता व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे. 
       
तरी माननीयांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर रितसर तक्रार घेऊन गुन्हा दाखल करून कारवाई करावी ही नंम्र विनंती असे नमुद केले. 
         
विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली तक्रारी देणाऱ्या शिष्ठमंडळात सैदप्पा जंगडेकर, इम्तियाज दर्जी, विठ्ठल कुऱ्हाडकर, दशरथ नंदाल, यलप्पा मिठ्ठा, रेखा आडकी, गणेश म्हंता, बबीता नाम्पेल्ली, यशवंत बिराजदार, लक्ष्मीबाई ईप्पा, सलीम शेख, संजीव शेट्टी,  नागार्जुन कुसुरकर आदिंचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments