सोलापूर-सोरेगाव जवळील गुलमोहर ऑर्केस्ट्रा बार येथे पोलिस आयुक्तांच्या विशेष भरारी पथकाने शनिवारी पहाटे तीनच्या सुमाराला कारवाई केली. संगीताच्या तालावर १३ नृत्यांगणा नृत्य करीत होत्या. ४३ जण त्यांच्यावर पैसे उडवत होते. गुलमोहरचे प्रमुख चालक तानाजी देवराव लकडे, आकाश चंद्रकांत जाधव यांच्यासह एकूण ४९ जणांवर विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या कारवाईत ७ मोटरसायकली, ८ चार चाकी वाहने, साऊंड सिस्टिम व अन्य साहित्य व रोख २ लाख ७१ हजार ८८० असे एकूण ५९ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आला आहे.
विशेष भरारी पथकाला हॉटेल पहाटे तीन वाजेपर्यंत चालू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी परिसरात पेट्रोलिंग करताना हॉटेलची पाहणी केली असता पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होते.४०-५० जण उपस्थित होते. महिला नृत्य करीत होत्या. ग्राहक पैसे उडवत होते.एकूण ४९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील काही ग्राहक बार्शी, मोहोळ, विजयपूर, इंडी परिसर तसेच सोलापूर शहर परिसरातील आहेत.ही कारवाई पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे,वाजीद पटेल,दिलीप भालशंकर,योगेश बरडे,संजय साळुंखे,नरेंद्र नक्का यांनी केली.
ऑर्केस्ट्रा बार मधील ग्राहक आणि चालकांवर गुन्हा दाखल-
हॉटेल चालक तानाजी देवराव लकडे, आकाश चंद्रकांत जाधव, शिवानंद मसळीकर (वेटर), देविदास दगडू गायकवाड (वेटर), गणेश दगडू गायकवाड (वेटर), अभिषेक मनोज दणाणे (बेटर). मल्लिकार्जुन मरूळ, इरण्णा पुजारी, बरकतअली कुरेशी, अमर कोंजारी, अमितकुमार मोटे, सिकंदर धोत्रे, मिराज कुरेशी, गौस अब्दुल टक्कळकी, आकाश हजारे, रवी निकम, प्रसाद आळंद, ताज उमराणी, रियाज पठाण, सैफ अली बागवान, इब्राहिम पटेल, मो. इरफान पटेल, नदीम पेंडारी, अरीफ कलेगार, शिरीश गायकवाड, आकाश पठारे, रोहन गंगणे, मोहंमद तौषिक तेनाली, निसार अहमद सातबच्चे, संतोष रेड्डी, गौस पटेल, महेश ठाकूर, जब्बार बागवान, अख्तार हुसेन दर्जी, अरबाज शेख, माणिक रेड्डी, अमितकुमार समदळ, महंमद जाहिद दंडू, अनिकेत गोरट्याल, इब्राहिम शेख, सैफन इरकल, सलीम तिलगर, गणपती पुजारी, पांडुरंग शामल, सागर गायकवाड, विनोद सूर्यवंशी, रितेश मारगम, यश सारंगी, समीर शेख (सर्व ग्राहक). यांच्यावर अश्लील नृत्यास प्रतिबंध आणि महिलांची प्रतिष्ठा संरक्षण कायदा २०१६ कलम ३, ८, (१), (२), (४) अन्वये गुन्हे दाखल झाले.
0 Comments