अवनी महाडीक यांची गुजरात येथे होणा-या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी निवड



कोल्हापूर:

 पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेत उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत अहमदाबाद, गुजरात येथे दि. २६ मार्च ते २७ मार्च रोजी होणाऱ्या ११ वर्षाखालील दुसऱ्या वेस्ट झोन राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या कु. अवनी  विनय महाडीक हिची निवड झाली आहे.

११ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धेत मुलांच्या संघात आरुष महाडीक, कपील बांदीवडेकर, अर्णव महाडीक, श्रीशैल पाटील, यश कालेकर, श्रीवर्धन महाडीक तसेच प्रथमेश सपटे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. तसेच १४ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धेत मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या संघामध्ये सई पाटील तसेच प्राची मटकर यांचा सहभाग होता. सर्व खेळाडूंना सौ. अपर्णा महाडीक ( एन. आय. एस. कोच) यांचे मार्गदर्शन तसेच श्री. विनय महाडीक याचे प्रोत्साहन लाभले.

Post a Comment

0 Comments