काँग्रेसच्या कार्य समितीची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत वक्तव्य केलं. पण काँग्रेसच्या कार्य समितीने त्यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाला एकमताने नाकारलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जर पक्षाला वाटत असेल तर आम्ही तिघेही (स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा) राजीनामा देण्यास तयार आहोत. पण काँग्रेस कार्य समितीने एकमताने हे नाकारले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, चार तास चाललेल्या या बैठकीत पाच राज्यांमधील पराभवामागील कारणांवर मंथन करण्यात आलं. या बैठकीनंतर काँग्रेसच्या कार्य समितीकडून बैठकीत नेमकं कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबतची माहिती देणारं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे.
0 Comments