पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर शहरात अवैधरित्या गुटख्याची तस्करी करणाऱ्यांवर पंढरपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये बारा लाखाच्या गुटखासह सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले
सोमवारी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी पंढरपूर शहरात अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्र पंढरपूर शहरात अवैधरित्या वाहून जात असताना टेम्पो काढण्यात आला यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला होता.
पंढरपूर शहर पोलिसांच्या कारवाईमध्ये टेम्पोमध्ये विमल पान मसाला, आर एम डी व सुगंधी तंबाखू असणारे गुटख्याचा मोठा साठा आढळून आला आहे. बारा लाख गुटखाची किंमत पोलिसांकडून सांगण्यात आली आहे. पाच लाख रुपयांची टेम्पो पोलिसांनी जप्त केल्या असल्याची माहिती पंढरपूर विभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.
0 Comments