बिग ब्रेकिंग! रशिया युक्रेन पहिल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू


युक्रेन :

रशिया आणि युक्रेन युद्धातील सर्वात मोठी आणि दुखद बातमी समोर आली आहे. रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय मृतक विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे.

 युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यापासून या रणभूमीत वास्तव्यास असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तिथे अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. अतिशय भयानक परिस्थितीत विद्यार्थी भेदरलेल्या अवस्थेत तिथे राहत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. सुरुवातीला हे युद्ध संपेल असं वाटत होतं. पण आता हे युद्ध आणखी चिघळताना दिसत आहे

Post a Comment

0 Comments