कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपने सुध्दा या निवडणुकीत उतरण्याची तयारी केली असून आज इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. बुधवारी भाजपचा दिल्लीहून अधिकृत उमेदवार जाहीर होणार आहे. 2019 मध्ये काँग्रेसकडून लढलेल्या सत्यजित कदम यांनीही यावेळी भाजपकडे उमेदवारी मागितली असून त्यांचे पारडे जड आहे. त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे ही निवडणूक होत आहे.
12 एप्रिलला याचे मतदान होणार असून निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जिह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस कडून या निवडणूकीत दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव याना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर शिवसेनेकडूनही राजेश क्षीरसागर यांनी या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. इथे मैत्रीपूर्ण लढत महाविकास आघाडीकडून लढवली जाण्याची दाट शक्यता आहे.
0 Comments