पत्नी माहेरी गेली म्हणून शेळगाव (आर) मधील इसमाने केले विषारी औषध प्राशन


वैराग/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील शेळगाव आर येथील एका इसमाने पत्नी माहेरी गेली म्हणून विषारी औषध प्राशन केल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, निलेश ज्ञानदेव गायकवाड (वय 36) रा. शेळगाव आर ता. बार्शी या इसमाने काही दिवसापासून पत्नी माहेरी गेलेली व तिला माहेरची मंडळी पाठवत नसल्यामुळे टेन्शनमध्ये येऊन शेतामध्ये विषारी औषध प्राशन केले आहेत. मुलगा उलट्या करत आहे हे लक्षात येताच मुलाच्या वडिलांनी ज्ञानदेव गायकवाड यांनी सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. उपचारासाठी दाखल केले तेव्हा त्या इसमाची प्रकृती अस्वस्थ व बेशुद्ध अवस्थेत होता, या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकी सोलापूर येथे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments