लातूर:
शासनाच्या कोणत्याही योजनेचे पैसे उचलण्यासाठी लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे लातूर जिल्ह्यातील देवणी पंचायत समितीच्या साहाय्यक अभियंत्यास घरकुलाचा शेवटचा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी नऊ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवणी तालुक्यातील कोनाळी येथील एकास रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळाले आहे. ते मिळवण्यासाठी पात्र असूनही त्यांना खूप धडपड करावी लागत होती, घरकुलाचा शेवटचा २० हजारांचा हप्ता फिर्यादीच्या वडिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी येथील पंचायत समितीतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तुकाराम पुंडलिक नरवटे यांनी पंचासमक्ष १० हजारांची मागणी केली.
तडजोडीअंती ९ हजारांची मागणी करुन ती पंचायत समितीच्या घरकुल विभागात स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी नरवटे यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक पंडित रेजितवाड हे करीत आहेत.
0 Comments