बार्शी/प्रतिनिधी:
काही दिवसापूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये ११ जानेवारीला मृत्यू झाला आहे, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीहरी रामु घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी रात्री दहाच्या दरम्यान कुर्डूवाडी रोड जवळील मस्तुद डक्टरांच्या हस्पीटल समोर कुर्डुवाडी रोड बार्शी येथे इसम नामे विष्णु विश्वनाथ शिंदे (वय ४०) वर्षे रा.व्ही.एस.टी शोरुमच्या पाठीमागे जैनमंदीराजवळ बार्शी ता.बार्शी यास कोणत्यातरी जोरदार धडक दिली. अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाने हयगईने, निष्काळजीपणे व बेदकारपणे वाहन चालवुन मयत नामे विष्णु विश्वनाथ शिंदे यास जोरात धडक देवुन तेथे न थांबता दवाखान्यात उपचाराकरीता घेवुन न जात व पोलीसांना खबर न देता तेथुन निघुन जावुन त्याचे मरणास कारणीभुत झाला आहे. वाहन चालका विरुद्द भादविसं कलम 304(अ),279, मो.वा.कायदा कलम 184 ,134(अ),(ब)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments