कर्मचारी याने आत्महत्या केली असून त्याचा मृतदेह उस्मानाबाद येथील बस आगरात उपोषणस्थळी आणल्याने तणावाचे व भावुक वातावरण निर्माण झाले आहे. सरकार व प्रशासन चा भावनाशून्य? कारभार पाहायला मिळत असून जाग कधी येणार हा प्रश्न विचारला जात आहे. कर्मचारी याने आत्महत्या काल केली असून 18 तास उलटत आले तरी जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी , आमदार या कुटुंबाच्या सांत्वनासाठी आला नाही त्यामुळे कर्मचारी यांची नाराजी आहे.
कोर्टात एसटी विलनीकरनाचा कोणताही निर्णय न झाल्याने एका कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. सरकार अजून किती कर्मचारी यांचे बळी घेणार? सरकारला जाग कधी येणार? हा संतप्त प्रश्न आता कर्मचारी विचारत आहेत. गेली 116 दिवसापासून अधिक काळ संप सुरु असून अनेक कर्मचारी यांच्यावर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे. वाहक हनुमंत चंद्रकांत अकोसकर यांचे मूळ गाव कोळेवाडी असून त्यांचे उस्मानाबाद मधील गणेशनगर भागात घर आहे त्यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी दुखवट्यात व आंदोलनात ते सहभागी होते. हनुमंत चंद्रकांत अकोसकर यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी आणि आई वडील आहेत. त्यांच्या या निर्णयाने घरावर व एसटी कर्मचारी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
0 Comments