बार्शी! पोलिसांविरोधातील आंदोलनाला येण्यासाठी महिलांना दिले पैसे


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यात कधी काय घडेल याचे नेम नाही. प्रत्येक वेळी बार्शी या ना त्या कारणाने राज्याभरात चर्चेत असते. आज पुन्हा बार्शीची चर्चा होण्याचे कारण म्हणजे एक आंदोलन. बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने आदोंलन करण्यात आलं. मात्र या आदोंलनासाठी आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी महिलांना चक्क पैसे देऊन बोलविल्याचा आरोप महिलांनीच केलाय. 

विशेष म्हणजे पैसे दिल्याची ओळख लक्षात यावी यासाठी महिलांच्या हातावर फुल्या देखील मारण्यात आल्या आहेत. या संदर्भात आम्ही राजेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क देखील साधला त्यावेळी माझ्या विरोधात रचलेलं हे षडयंत्र आहे. संबंधित महिलेने आपल्याला फोन केला होता. आंदोलनात महिलांना घेऊन येईन मात्र त्यांचा रोजगार बुडेल. त्याची सोय करावी अशी विनंती केली होती. त्या महिलांचे रोजगार बुडू नये. यासाठी आपण त्यांना सहकार्य़ केलं. यात काय चुकले? असे स्पष्टीकरण आरपीआयचे राजेंद्र गायकवाड यांनी दिले आहे. दरम्यान बार्शीचे पोलिस निरीक्षक रामदान शेळके यांनी एका महिलेचा विनयभंग केला. तसेच ते नेहमीच अरेरावीची भाषा वापरत असतात. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज बार्शी तहसील कार्य़ालसमोर आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या कार्य़कर्त्या एँड. निवेदिता अरगडे यांचा पोलिस निरीक्षक शेळके यांनी विनयभंग केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच त्यांच्याविरोधात गु्न्हा नोंद करुन तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकांनी केली.

 मात्र पोलिसांच्या विरोधात सुरु असलेलं आंदोलन पाहून प्रहारच्यावतीने सर्मथनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पोलिसांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक शेळके बार्शीत आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न कमी झाले आहेत. एखादा अधिकारी चांगला काम करत असताना खोटे आरोप करुन आंदोलन करणे चुकीचे आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक शेळके यांच्या समर्थनार्थ आम्ही आहोत. असे मत प्रहारच्या पदाधिकारी संजीवनी बारंगुळे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments