बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी सोलापूर महामार्गावर सौंदरे गावाजवळ मोटरसायकलला धडक दिली आहे. यामुळे मोटरसायकलवरील दहा वर्षाच्या मुलागा जागीच ठार झाला आहे. या घटनेची फिर्याद संतोष रमेश काळे (वय-३८) रा.आझाद चौक वैराग यांनी दिली असून एका विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजणेचे सुमारास बार्शी ते वैराग कडे जाणारे रोडवर सौंदरे गावाजवळ अँपे टमटम क्र. MH 13 CT ७४०९ चा ड्रायव्हर सलमान इजाज बागवान रा.संगमेश्वर नगर मशिद जवळ अक्कलकोट याने त्याचे ताब्यातील अँपे टमटम क्र. एम एच १३ सी टी ७४०९ अविचाराने, हयगईने रोडच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन मोटार सायकल नं- एम क्यू ७२५३ हिस पाठीमागुन ओव्हरटेक करताना जोराची धडक देवुन मोटार सायकलला धडक दिल्याने त्यात फिर्यादी व पत्नी जखमी करून, मुलगा ओम संतोष काळे (वय-१०) रा.वैराग ता. बार्शी जि.सोलापुर मुळ रा. काळेगांव ता. बार्शी , जि.सोलापुर यास गंभीर जखमी करून उपचारापुर्वीच २० फेब्रुवारी रोजी मयत होण्यास कारणीभुत झाला आहे.व मोटार सायकलची मोडतोड झाल्याने अंदाजे ७,०००/- रूपयाचे नुकसान केले आहे. त्यामुळे संपूर्ण चालकावर भादवि कलम २७९, ३०४-A, मोटरवाहन अधिनियम १७७, १८४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments