वैराग! मुस्लिम मावळ्याच्या घरी शिवाजी महाराजांना अभिवादन; बसपाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाला हजेरी


वैराग/प्रतिनिधी:

बहुजन समाज पार्टी बार्शी विधानसभा व वैराग शहर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची खऱ्या अर्थाने आता देशाला गरज आहे. आपल्या देशामध्ये चंगळवाद चालू असून महापुरुषांचे विचार मागे पडू लागले आहे, छत्रपतींनी स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य निर्माण केले.
त्या राज्यांमध्ये आज पुन्हा एकदा मनुवादी प्रवर्ती डोकं वर करून पाहत आहे, म्हणून छत्रपती शिवरायांचे विचार खऱ्या अर्थाने आज आपल्याला अशा प्रवृत्तीपासून वाचणार आहेत म्हणून छत्रपतींचा खरा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीला माहीत असणे गरजेचे आहे. 
 बहुजन समाज पार्टीचे सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष विलास जी शेरखाने, बार्शी विधानसभा उपाध्यक्ष श्रीश कुमार कांबळे, वैराग शहर अध्यक्ष ताजोदीन ( बाबा ) शेख, सतीश डोळसे, त्याचबरोबर वैराग शहर प्रभारी नागेश ठोंबरे, वडार भाईचारा अध्यक्ष परमेश्वर जाधव जकिया शेख, आरमान शेख, आयान शेख, सुबहान शेख, खरून शेख, एजाज़ शेख, करन सकट, एकनाथ वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments