"मला युक्रेनमध्ये जाऊ द्या खासदार नाईक निंबाळकर"



सध्या रशिया व युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, विद्यार्थी व नागरिक यांना भारतात आणण्यासाठी परत  भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवल्या जाणार्‍या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

केंद्र सरकारला केलेल्या मागणीत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हटले की, युक्रेन आणि रशियामधील सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी परतावे लागत आहे. त्यांना स्वदेशी सुरक्षितपणे परत आणण्याची जास्त काळजी वाटते, असे सांगून खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे.

Post a Comment

0 Comments