गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार अंतर्गत वादाने कोसळणार, असा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर येत्या १० मार्चपर्यंत महाविकास आघाडी जाणार, असं सांगितलं होतं. त्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील हे मोठे व्यक्ती आहेत. मी लहान कार्यकर्ता आहे. त्यावर काय बोलणार?, असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला आहे. विधानसभेतील १२आमदारांच्या निलंबनाबाबत बोलताना अजित पवार यांनी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असल्याने आम्हाला त्याचं पालन करावं लागतयं, असं सांगितलं आहे. तसेच राहुल बजाज यांच्या उद्योग क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा स्वभाव स्पष्टवक्ता होता. उद्योग करताना सामाजिक क्षेत्रासाठी काय करता येईल, याचा ते नेहमी विचार करायच , असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
0 Comments