बार्शी! खडकोणी येथे मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई; ३५ हजाराचा मुद्देमाल जप्‍त


बार्शी तालुक्यातील खडकोणी येथे मन्ना नावाचा जुगार पैशाची पैज लावून खेळणाऱ्या ८ जणांवर तालुका पोलिसांनी गुन्हे दाखल केले, असून त्यांच्याकडून मोटरसायकल मोबाईल फोन यांच्यासह ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल शंकर अशोक वाघमारे यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार खडकोणी गावांमध्ये पैशाची पैज लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ फेब्रुवारी रोजी ५.०० वाजण्याच्या सुमारास खंडोबाच्या मंदिराशेजारील वडाच्या झाडाखाली
1) विक्रम किसन नलवडे 2) जिवन नाना इजगज 3) वैभव श्रीमंत नलवडे 4) अतुल शहाजी शिंदे 5) पदमाकर चंदनशिव शिंदे 6) अंकुश रामेश्वर नलवडे 7) हनुमंत श्रीमंत नलवडे 8) विलास उत्तम नलवडे सर्व रा खडकोणी ता बार्शी, हे मण्णा नावाचा जुगार खेळत असताना खेळताना पोलिसांना आढळून आले पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली असता,  त्यांचेकडून जुगाराचे साहित्य 52 पानी पत्याचा डाव,रोख रक्कम,मोबार्इल व एक मोटार सायकल असा 35440/- रूपये किंमतीचा माल मिळून आला. नमुद 01 ते 08 इसमाविरूध्द मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments