मानेगाव येथे आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या तिघांविरुद्ध बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल



बार्शी/प्रतिनिधी:

माढा तालुक्यातील मानेगाव येथे वीज घरगुती वीज जोडणीची  तपासणी केली असता म.रा.वि.वि. कंपनीच्या  लघु दाब वाहिनी वरती स्वत:हून हुक टाकून अनधिकृतपणे सिंगल कोअर काळ्या रंगाच्या वायरने वीज वापर करीत असल्याचे दिसून आले, मृणाली रामकिसन मसराम कनिष्ठ अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यातील मानेगाव येथे महावितरणचे पथक तपासणीसाठी गेले असता घरगुती वापरासाठी महावितरण च्या तालावर खूप लावून बेकायदा चोरट्या पद्धतीने वीज चोरताना आढळून आले. या पथकामध्ये कनिष्ठ अभियंता मृणाली रामकिसन मसराम, महावीर राऊत (बाह्य स्त्रोत कर्मचारी), नारायण करवर (वरिष्ठ तंत्रज्ञ) यांचा समावेश होता. ही कारवाई 17 सप्टेंबर 2019 रोजी महावितरणने केली होती, त्यानंतर दंडाची रक्कम भरण्यासाठी सहा महिन्याचा अवधी दिला होता. त्यांनी कोणत्याही प्रकारचा दंड न भरल्यामुळे सुनील शिवाजीराव देशमुख, नितीन अभिमान पवार, किशोर भिका माने सर्वजण रा. मालेगाव ता. माढा यांच्या विरोधात भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments