बार्शी! कन्सर हॉस्पिटल चौक रिक्षा स्टॉप येथील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; महागडा मोबाईल केला परत



बार्शी शहरातील कॅन्सर हॉस्पिटल चौक रिक्षा स्टॉप येथील रिक्षा चालक व ओन्ली समाजसेवा ग्रुपचे सदस्य सचिन श्रीमंत लोकरे यांनी त्यांच्या रिक्षात सापडलेला प्रवाशाचा महागडा मोबाईल परत केला.

यापूर्वी बार्शीतील देवीदास हरीचंद्र जाधव राहणार पंकजनगर बार्शी या रिक्षाचालकाने एका व्यापाऱ्याची रिक्षा मध्ये विसरलेली पैश्याची बॅग त्या व्यापाऱ्यास परत केली होती. आज पुन्हा बार्शीतील रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय बार्शीकरांना आला आहे.

कॅन्सर हॉस्पिटल चौक रिक्षा स्टॉप येथील रिक्षा चालक व ओन्ली समाज सेवा ग्रुपचे प्रमुख सदस्य सचिन श्रीमंत लोकरे यांना त्यांच्या रिक्षात सापडलेला किमती मोबाईल त्यांनी सुभाष नगर पोलीस चौकीत जमा करुन त्यांच्या रिक्षामध्ये प्रवास करणारे प्रवासी लक्ष्मण जाधव यांना खात्री करून त्यांचा मोबाईल भैया वाणी ,राहुल वाणी, अकबर तांबोळी ,अनिल खुडे,पोलीस हवालदार दबडे यांच्या समक्ष परत देण्यात आला.

Post a Comment

0 Comments