बार्शी/प्रतिनिधी:
'दारू प्यायला पैसे दिले नाही' म्हणून खांडवी मध्ये दोघांना कुर्हाडीने मारहाण केल्याची घटना घडली आहे, त्यामुळे एका परप्रांतीयावर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शाबानवी पाषामिया शेख (वय ५०) रा. खांडवी ता. बार्शी यांच्या पतीला २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीच्या शेळी पालनाच्या शेड जवळ दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पाषामिया दादामिया शेख (वय ६५) पाठीमागून येऊन डोक्यात कुराड मारून गंभीर जखमी केले तर सोडवायला गेलेल्या रहीम सदूला शेख याच्या डोक्यात उलटी कुराड घालून किरकोळ जखमी केले. म्हणून कार्तिक बिल्लू ओराओन (वय ३०) रा. आनंदपूर, पश्चिम बंगाल यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०७,३२३,३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.
0 Comments