वैराग/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील साकत ते बावी दरम्यान अवैधरित्या वाळूची तस्करी करून वाहतूक केली जात असल्याची माहिती वैराग पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांना बिगर नंबर चा ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आढळून आला. पंचांसमक्ष पोलिसांनी ताब्यात घेऊन तिघांजनाविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील निळकंठा नदीमधून अवैधरित्या वाळू उपसा करून तिघा जणांनी मिळून पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे माहीत असतानासुद्धा शासनाची कुठलीही परवानगी न घेता वाळूची तस्करी केली आहे. त्यांच्याकडून 6 लाख, 7 हजाराचा पोलिसांनी जप्त केला आहे. विना नंबरचा ट्रॅक्टर चालक सुधिर अनिल मोरे वय- 27 वर्षे, याच्यासह दत्तात्रय महादेव मोरे वय- 18 वर्षे, संदिप रावसाहेब लोखंडे वय- 24 वर्षे सर्व रा साकत पा, ता बार्शी या तिघांवर भा. द. वि. कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 9 व 15 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर राजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
0 Comments