सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या वस्तीत हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त केला आहे.या दारू अड्ड्यामुळे आजूबाजूच्या महिलांना दररोज नाहक त्रास सोसावा लागत होता.पोलिसांना अनेक वेळा तक्रारी करून देखील कारवाई केली जात नाही,शेवटी परिसरातील वैतागलेल्या महिलांनी पार,कुदळ,खोऱ्या ही औजारे हातात घेऊन उध्वस्त केला आहे.
पोलिसांकडे तक्रारी करून देखील दारू अड्डा सुरू होता-
महिलांनी बोलताना माहिती दिली की,पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या.पोलीस आयुक्त यांना देखील निवेदन दिले होते,मात्र कारवाई होत नव्हती.मोटे वस्ती येथील महिलांनी पुढाकार घेऊन आज मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी हा हातभट्टी दारू अड्डा उद्धवस्त केला.
तळीरामामुळे मोटे वस्तीतील महिला त्रस्त-
मोटे वस्ती येथील महिला गेल्या अनेक महिन्यापासून त्रस्त होत्या.दारू ढोसणारे तळीराम,बेवडे हे आजूबाजूला असलेल्या घरांत जात होते.आणि महिला व मुलींना वाईट नजरेने पाहत होते.
0 Comments