माढा! मिटकलवाडी येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू


मिटकलवाडी ता. माढा जि. सोलापूर येथील शेतकरी अर्जुन मिटकल हे रात्रीच्या वेळी ऊसाला पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेले असता त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याबरोबर ते आपल्या मोटरसायकलीकडे गेले पण सर्प विषारी असल्यामुळे अर्जुन मिटकल हे गाडी पर्यंत पोहोचू शकले नाहीत.

त्यांचे बंधू तानाजी मिटकल व धनाजी मिटकल यांनी १० वाजताच्या दरम्याने अर्जुन मिटकल यांना जेवणासाठी फोन केला पण अर्जुन मिटकल यांना विषारी असा सर्पदंश झाल्यामुळे त्यांचा फोन रिसिव्ह सुध्दा करता आला नाही. 
अर्जुन मिटकल हे फोन उचलत नसल्याने त्यांचे बंधू तानाजी मिटकल व धनाजी मिटकल हे शेतामध्ये गेले असता त्यांना आपला भाऊ अर्जुन मिटकल हा गाडी जवळ पडलेल्या अवस्थेत दिसला लगेच त्यांनी तातडीने अकलूज येथील इनामदार डॉक्टर यांच्या दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले पण सर्प विषारी असल्यामुळे त्यांचा मृत्यू जागीच झाला होता.

Post a Comment

0 Comments