वैराग नगरपंचायत साठी निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाही : जयंत पाटील



राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेतील सभा वैराग येथे पार पडली. यावेळी नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बार्शी मतदारसंघात पक्ष बलवान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. कंबर कसली तर इथे राष्ट्रवादीमय वातावरण होऊ शकते.येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिटी मजबूत करा .तसेच वैराग नगरपंचायतला निधीची कसलीच कमतरता पडू दिली जाणार नाही असा शब्द दिला. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या विचाराने कार्यकर्ते इथे काम करत आहेत, याचे कौतुक जयंत पाटील यांनी केले.

या सभेला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुंखे, शरद लाड ,कार्याध्यक्ष उमेश पाटील, व्यापार व उद्योग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे,  अल्पसंख्याक अध्यक्ष वसिम बुरहाण, लतिफ तांबोळी, जिल्हा निरीक्षक दिपालीताई पांढरे, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रियाताई गुंड, विक्रम सावळे,महिला कार्याध्यक्षा रंजना हजारे, तालुकाध्यक्ष राजकुमार पौळ आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments