करमाळा! मकाई वरील साखर आयुक्तांची कारवाई चुकीची : युवा नेते सतीश नीळ

करमाळा/प्रतिनिधी:

 मकाई हा तालुक्याचे सहकारातील अस्तित्व असणारा कारखाना आहे. मकाईने नेहमीच सभासदांचे हित लक्षात घेऊन ऊसाचे गाळप केले आहे. या वर्षी ही अनेक अडचणीतून मकाई यशस्वीपणे घौडदौड करत असतानाच गाळप परवाना घेतला नाही म्हणून साखर आयुक्तांनी केलेली सदरची कारवाई शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. आज तालुक्यात आमच्या भागासहित अजून ही उस जागच्या जागीच तसाच उभा आहे. ऊसाचा अतिरिक्त प्रश्न निर्माण होत आहे. जर मकाईवर आयुक्तांनी अशी चुकीची कारवाई करुन कारखाना बंद पाडण्याचे काम केले. तर तालुक्यातील ऊस गाळप न झाल्यास सगळा ऊस आयुक्तांच्या कार्यालयात आपण शेतकऱ्यांसह  घेऊन जाणार असल्याचे नीळ यांनी सांगितले.
      
चालू वर्षी तालुक्यात सर्वाधिक ऊस दर देण्याचे काम मकाईने केले आहे. या वर्षी आपला ऊस चांगल्या भावात मकाईने गाळप केल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जर कारवाई करायची झाली तर इतर कारखान्यावर का कारवाई करण्यात आली नाही. उलट शेतकऱ्यांची फसवणूक करणारे अनेक कारखाने गाळप परवाना न‌ घेता ऊस गाळप करत आहेत, त्यांचे नाव आपल्या यादीत का नाही. सदर कारवाई ही राजकीय आकसा पोटी करण्यात आली आहे, ही कारवाई जर साखर आयुक्तांनी रद्द नाही केली तर जो ऊस तसाच गाळप न करता शिल्लक राहील तो सगळा ऊस ट्रक,ट्रॅक्टर मध्ये भरून शेतकऱ्यांना घेऊन आयुक्तांच्या कार्यालयात टाकणार असल्याचे ते म्हणाले. मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून यावर्षी कारखाना चालू करुन शेतकऱ्यांचा ऊस चांगल्या प्रकारे गाळप केले आहे. जवळ जवळ तालुक्यातील दोन लाख टन‌ ऊस गाळप करण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा विचार करून सदरची कारवाई रद्द करण्यात यावी असेही नीळ म्हणाले.

जिल्ह्यातील इतर कारखाने विनापरवाना ऊस गाळप करत आहेत, असे असताना शेतकऱ्यांना ऊसाचा चांगला दर देणा-या मकाईवरच का कारवाई  करण्यात आली. आज तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस अजून शिल्लक आहे, जर या कारवाईने कारखाना बंद राहिला तर सगळा ऊस शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात टाकणार आहे. स्वतःची मालमत्ता शेतकरी हितासाठी गहाण ठेवून कारखाना चालवणा-या चेअरमन दिग्विजय बागल यांच्या पाठीशी आम्ही सर्व सभासद ठामपणे उभा आहे. कोणत्याही परिस्थितीत साखर आयुक्तांनी ही दंडात्मक कार्यवाही रद्द करावी अन्यथा यातून खूप मोठे नुकसान आम्हा शेतकरी सभासदांचे होणार आहे, याला जबाबदार मा. साखर आयुक्त असतील- सतीश नीळ, अध्यक्ष, सीना कोळगाव धरणग्रस्त संघटना

Post a Comment

0 Comments