शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभा केलेल्या पोल-डीपीचे भाडे द्या ; मगच वीजपुरवठा खंडित करा : सतीश नीळ पाटील



करमाळा/प्रतिनिधी:

राज्य सरकारने वीज कायदा २००३ कलम ५७ अन्वये अगोदर आमच्या शेतात जे पोल, डिपी उभारले आहेत त्याचे भू भाडे द्यावे मगच वीज पुरवठा खंडित करावा अन्यथा आम्ही सर्व शेतकरी बांधव तीव्र आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे ईमेल व्दारे कळविले आहे.

 श्री नीळ पाटील यांनी निवेदनात  म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील विविध भागांत वीज बील भरावे म्हणून वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.व वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तसाच उभा आहे, ऊस तोडणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव नाकात आला आहे. त्यात भर म्हणून आत्ता वीज पुरवठा खंडित केला जात आहे. उभी पिके जळून खाक होणार आहेत. अगोदरच सर्व शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.व आत्ता वीज पुरवठा खंडित केला तर आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. याशिवाय आम्ही सर्व शेतकरी बांधव यांनी गेल्या एक महिन्यापूर्वीच ५००० ते, १०००० रू. एच पी नुसार बील भरणा केले आहेत. 
      
आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपणास विनंती आहे की, आपण स्वतः लक्ष घालून अगोदर आमच्या शेतात जे पोल,डीपी, रोवले आहेत त्याचे वीज कायदा २००३ कलम ५७ नुसार होणारे भुभाडे आमच्या शेतकऱ्यांना द्या व मगच वीज पुरवठा खंडित करा, किंवा ते भाडे आमच्या वीज बिलात जमा करून घ्या. विनाकारण आम्हाला नोटीस देऊन त्रास देऊ नका.व वीज पुरवठा खंडित करू नये. खंडित केलेला वीज पुरवठा तात्काळ चालू करावा असे सर्व सबंधित अधिकारी यांना आदेश द्यावेत हि आदरपूर्वक नम्र विनंती.

अन्यथा आम्ही सर्व शेतकरी बांधव तीव्र आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी. असेही शेवटी निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे,खा. रणजितसिंह निंबाळकर,आ.रणजितसिंह मोहिते पाटील,आ. संजय मामा शिंदे, शिवसेना नेत्या,जिल्हा  बँकेच्या संचालिका रश्मी दिदी बागल,प्रधान सचिव, वीज वितरण प्राधिकरण, प्रकाशगड,म रा. मुंबई,प्रधान सचिव, ऊर्जा विभाग मंत्रालय मुंबई. जिल्हाधिकारी सोलापूर,कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी बार्शी.जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर ,उप अभियंता वीज वितरण कंपनी जेऊर व करमाळा यांना ईमेल व्दारे पाठविल्या आहेत.

Post a Comment

0 Comments