आमदार ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कमांडो अकॅडमी रक्तदान शिबिराचे आयोजन


परांडा/प्रतिनिधी:

आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त परांडा शहरातील कमांडो करिअर ॲकॅडमी मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले अशी माहिती कमांडो करिअर अकॅडमी चे संचालक तथा संस्थापक मेजर महावीर तनपुरे यांनी दिले.

कमांडो करिअर अकॅडमी हे सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असणारी परांडा मधील संस्था मानली जाते, गड किल्ल्याची स्वच्छता असो किंवा इतर सामाजिक उपक्रम यामध्ये कमांडो अकॅडमी ने आजपर्यंत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्याच ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments