खांडवीमध्ये शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील खांडवी गावांमध्ये गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःच्या शेतातील झाडा दोरीच्या साह्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे, त्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. बालाजी नामदेव ठाकरे वय (35) रा. खांडवी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे समजतात गळफास सोडवुन बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले , उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात शिव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक अभिजीत घाटे करत आहेत.

Post a Comment

0 Comments