खासदार सुप्रिया सुळे ७ व्यांदा ‘संसद रत्न’ने सन्मानित होणार



राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार(MP) सुप्रिया सुळे यांना ‘संसद रत्न २०२२’ पुरस्कारने गौरविण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांना सात वेळा ‘संसद रत्न’ या पुरस्कार मिळाला आहे.

प्राइम पॉईंट फाऊंडेशनने ११ ‘संसद रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संसद रत्न हा पुरस्कार संसदेत अर्थ, कृषी, शिक्षण आणि कामगार मंत्रालयाच्या समितीमध्ये योगदान दिल्याबद्दल गौरविण्यात येतो. या ११ खासदारापैकी चार खासदार हे महाराष्ट्रतील आहेत. यात खासदार(MP) सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान आणि भाजपच्या खासदार हीना गावित यांचा समावेश आहे.

१७ व्या लोकसभेत महाराष्ट्रा व्यतिरिक्त पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार(MP) सौगता रॉय (पश्चिम बंगाल), काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार बेटे), आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार विद्युत बरन महतो (झारखंड), हीना विजयकुमार गावित (महाराष्ट्र) आणि सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) यांना संसद रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा २६ जानेवारी रोजी दिल्लीत होणार आहेत. तसेच तमिळनाडूच्या खासदार एचवी हांडे आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एम. वीरप्पा मोईल या दोघांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारासाठी निवडले गेले आहेत.

खासदारांच्या कामगिरीच्या आधारे निवड करण्यात आली आहे. यात पीआरएस इंडियाने दिलेल्या डेटाच्या आधारे पुरस्कार प्रधान करण्यात येतो, असे प्राइम पॉईंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष के. श्रीनिवासन सांगितले.

Post a Comment

0 Comments