बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील धामणगाव मध्ये मुलगा घरात घुसण्याचा संशय घेऊन मुलाला व मुलाच्या आईला शिवीगाळ व मुलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुपाली विठ्ठल अवधुत ( वय-30) रा. धामणगाव ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 फेब्रुवारी रोजी
दुपारी 3/45 वा.चे सुमारास तालुक्यातील धामणगाव येथे घडली आहे. फिर्यादी चा मुलगा याने मुलगा सोहम त्याचे घरात गेलेचा संशय धरुन त्यास चापटाने व काठीने मारहाण करुन जखमी केले आहे. तसेच सोडवासोडव करणेस मध्ये गेली असता मलाही धक्काबुक्की केली आहे. त्यामुळे फिर्यादी महिलेच्या दिलेल्या तक्रारीनुसार पंडित भाऊराव काटे रा.धामणगाव ता.बार्शी यांच्यावर तालुका पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम 323 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments