अमरावती! कुऱ्हाडीने सपासप वार करुन सासूची हत्या


अमरावती - कुऱ्हाडीने वार करुन सासूची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा पूर्णा येथे समोर आली आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा उर्फ रुक्माबाई इंगळे ( वय ४५ ) मृत महिलेचे, तर दिनेश बोरखडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची पत्नी स्नेहल बोरखडे ही आई आजारी पडल्याने माहेरी आली होती. मात्र, पत्नी घरी न आल्याने दिनेश हा सारवाडीला गेला. तिथे त्याने सुरुवातीला पत्नीशी वाद घातला. यावेळी भांडण सोडायला गेलेल्या सासूवर दिनेशने कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात सासूचा जागीचा मृत्यू झाला, तर पत्नी जखमी झाली. याप्रकरणी आसेगाव पुर्णा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Post a Comment

0 Comments