“पंकजा मुंडेंचा भाजपत छळ होतो म्हणून मीच त्यांना पहिली ऑफर दिली”



भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर देणारा मीच होतो, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये छळ होत असल्याने त्यांनी शिवसेनेत यावं म्हणून मी त्यांना सर्वात पहिले ऑफर दिली होती. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना कोणतं पद द्याचचं हे उद्धव ठाकरे ठरवतील, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंडे परिवाराचं काम मोठं आहे. त्यांच्या वारसदाराला कुठे न्याय मिळेल अशी समाजाची अपेक्षा होती. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच आहे. तसेच त्यांना शिवसेनेत स्थान आणि सन्मान दोन्ही मिळेल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. तसेच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी मुंडे सर्मथकांकडून केली जात आहे, अशात गुलाबराव पाटील यांनी केेलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. मात्र याआधी पत्रकार परिषद घेत आम्ही नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय.

Post a Comment

0 Comments