धुळे जिल्ह्यातील लामकानी याठिकाणी दोन मित्रांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला घरी स्वयंपाक करण्यासाठी बोलवलं आणि आपल्या मित्राच्या मदतीनं तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अत्याचाराचा व्हिडीओदेखील शूट केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अनिल भिल आणि काळू भिल असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहे.
0 Comments