बार्शी/प्रतिनिधी:
आॅल इंडिया स्टुडंन्टस् फेडरेशन, बार्शी तालूका कौन्सिल च्या वतिने दिनांक २३ मार्च २०२१ वार मंगळवार रोजी आयटक कामगार केंद्र, बार्शी येथे शहिद दिन वैचारिक शिबीर आयोजित करून साजरा करण्यात आला. यावेळी शहिद काॅम्रेड भगसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी काॅम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांनी जमलेल्या विद्यर्थ्याना मार्गदर्शन केले, ते म्हणाले, शहिदांच्या विचारांनी बेरोजगारी, शिक्षण, शेतकर्यांच्या प्रश्नांवर तरूणांनी तिव्र लढा उभा करून आरएसएस सारख्या धर्मांध शक्तींना नेस्तनाभू करणे आवश्यक झाले आहे, देशात अभूतपूर्व संघर्षाची परस्थिती निर्माण झाली आहे, स्वातंत्र संग्रामात सहभागी न झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सत्तेवर बसला आहे, शहिदांना जे अपेक्षीत नव्हते ते भांडवलदारांचे पोषण मोदींच्या आडून संघ करीत आहेत, आंबानी, अडानी यांची कारोडोंची संपत्ती वाढत आहे तर दुसरीकडे दोन वेळच्या जेवणाची वनवा आहे, जातीय धार्मींक दंगे घडवून भौतिक प्रश्नांपासून लांब नेहले जात आहे, हि परस्थिती बदलण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी, अल्पसंख्यांक यांनी एकत्र येणे आवश्यक झाले आहे, भगसिंगांचा डावा विचार हि परस्थिती नक्कीच नेस्तनाभूत करेल.
यावेळी, काॅम्रेड प्रविण मस्तुद यांनी आॅल इंडिया स्टुडंन्टस फेडरशनचा इतिहास सांगितला, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन काॅम्रेड पवन आहिरे यांनी केले तर आभार आयाज शेख यांनी मानले, यावेळी अविराज चांदण, हर्षवर्धन जाधव, अनिरूध्द नखाते, सागर खडतरे, जयगुरू गिरी, संदेश अंधारे , सारंग पवार, यशराज काकडे, अक्षय चव्हाण, निलेश शेंडे, अमित अंकुशे, दिनेश कुसाळकर, सुदिप्त हालदार आदी उपस्थीत होते.
0 Comments