भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी पुण्यातील भाजप नेत्यांसह आज उपमुख्यमंत्री यांची आज भेट घेतली. अजित पवार आणि चंद्रकात पाटील यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज पवारांनी करोवा आढावा बैठकीचे आयोजन केलं होतं. तसंच, वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखायच्या याबाबतही या बैठकीत निर्णय झाला असल्याची चर्चा आहे.
या बैठकीपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. चंद्रकांत पाटील यांनी दोन मागण्यांसाठी अजित पवारांची भेट घेतली होती. तसंच, पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भातही या भेटीत चर्चा झाली आहे. या बैठकीत लॉकडाऊनसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात नाल्यांना पूर येऊन मोठं नुकसान होतय. त्यामुळे नाल्यांच्या दुरुस्तीची कामे करणं गरजेचं आहे.
परंतु भाजपच्या ताब्यात असलेल्या पुणे महापालिकेकडे त्यासाठीचा आवश्यक निधी नसल्यानं राज्य सरकारने नाले दुरुस्तीसाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलीय. तसंच, बँकेतील कर्मचारी आणि पत्रकारांनाही कोविड योद्धा मानून त्यांच्यासाठीही करोना लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. लॉकडाऊन नकोच करोना लसीकरण अजूनही काही महिने चालणार आहे. त्यामुळं काही गोष्टी बंद करणे, व लॉकडाऊन करा या पेक्षा गर्दीवर मर्यादा आणणे व लोकांना काळजी घेण्यासाठी गरज आहे. करोना संदर्भात खबरदारी बाळगणे महत्त्वाचं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
0 Comments