'तू परत येना प्लीज’, अर्जुन झाला आईच्या आठवणीत भावुक


 बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अर्जुनने त्यांच्या आईच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त आठवण येत असल्याची एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या आईचे नाव मोना शौर्यी आहे. त्या निर्माता बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी होत्या.

अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या आईचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत त्याच्या आईने लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. “आता ९ वर्षे झाली आहेत, हे योग्य नाही, मला तुझी आठवण येते कृपया तू परत येना…तू माझी चिंता करायचीस, तू फोन केल्यावर तुझ नाव माझ्या फोनवर दिसायचं त्याची मला आठवण येत आहे, घरी आल्यावर तुला पाहणं याची मला आठवण येते…मला तुझं हसू आठवत आहे, तू अर्जुन बोलायचीस त्या आवाजाची मला आठवण येत आहे. आई मला तुझी खूप आठवण येते, मला आशा आहे की तू जिथेपण आहेस तिथे ठिक आहेस, मी ही पहिले सारखा होण्याचा प्रयत्न करत आहे. पण तू परत ये ना मला तुझी आठवण येत आहे.” अशा आशयाचं कॅप्शन अर्जुनने त्या फोटोला दिलं आहे.

Post a Comment

0 Comments