पंढरपूर मध्ये आचारसंहिता चालू असताना सापडली लाखोचे रोकड


पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून रस्त्यारस्त्यावर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. (दि.१६) मार्चला आचारसंहिता लागू झाल्यापासून अशा तपासण्या सुरु झालेल्या आहेत. दरम्यान पंढरपूर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकाने अहिल्या चौक, भटुंबरे शिवारात ११ लाख १७ हजाराची रक्कम एका वाहनातून घेऊन जात असताना स्थिर सर्वेक्षण पथकाने पकडली आहे.

निवडणूक क्षेत्र असणाऱ्या परिसरात आचारसंहिता लागू असते, अशा परिसरात बेहिशेबी रोख रक्कम घेऊन प्रवास करणे. हे निवडणूक आयोगाच्या नियमास धरून नाही. तालुक्यातील अहिल्या चौकात येथील स्थिर सर्वेक्षण पथकाने पुणे येथील व्यापारी आपल्या वाहनातून ११ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन जाताना आढळला.

सध्या संबंधित इसमाकडे आयोगाकडून तपासणी व चौकशी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने सदरची रक्कम ताब्यात घेतली आहे. अहिल्या चौकात तपासणी दरम्यान या वाहनातून ही रक्कम सर्वेक्षण पथकाच्या हाती लागली आहे. रात्री सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या या तपासणीत ही रक्कम हाती लागली आहे. ही रक्कम कोठून आणली, कोठे घेऊन चालले आहेत, याबाबत निवडणूक आयोगाकडून अधिक तपासणी सुरू आहे.

Post a Comment

0 Comments