सावधान! आता मोबाइलवर पॉर्न सर्च करणं पडणार महागात; असा येणार अलर्ट मेसेज


महिला अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अश्‍लील व्हिडीओमुळे लैंगिक अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे आंबटशौकिनांना आळा घालण्यासाठी पॉर्न पाहणार्‍यांवर आता ’१०९०’ ची नजर राहणार आहे. या योजनेंतर्गत अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या लोकांची मानसिकता बदलण्याचा पोलिस प्रयत्न करणार आहेत. यामध्ये इंटरनेट मीडियाचा वापर केला जाईल. ऑनलाइन अश्लील सामग्री शोधताच सावधगिरी बाळगण्यासाठी १०९० आपल्याला सतर्क करेल. ही सर्व माहिती १०९० सह नोंदविली जाईल.

मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहणे आता महागात पडणार आहे. कारण अशा आंबटशौकिनांवर १०९० टीमची नजर असणार आहे. पॉर्नमुळे महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे हे वाढते गुन्हे रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

१०९० च्या एका आयोजित कार्यक्रमात एडीजी नीरा रावत यांनी इंटरनेटवरील वाढत्या सर्च मोहीमेसंबंधी बोलताना ही माहिती दिली आहे. १०९० ने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमाचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. उत्तर प्रदेश मध्ये डिजिटल चक्रव्यूहसाठी एक डिजिटल आउटरिच रोडमॅप तयार करण्यात आला आहे.

 

Post a Comment

0 Comments