करमाळ्यात शिवजयंती बाबत शांतता समितीची बैठक


करमाळा/प्रतिनिधी:
            
करमाळा तहसील कार्यालय येथे आज सकाळी साडे अकरा वाजता दिनांक १९ फेब्रुवारी रोजी साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा करण्याबाबत तहसीलदार समीर माने यांचे अध्यक्ष खाली मिटींग आयोजित केली होती.

 यावेळी पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, करमाळा मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी, नगरसेवक सचिन घोलप, विजय लावंड शिवसेना नेते, संजय शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, सचिन काळे, महिला आघाडीचे निलावती ताई कांबळे,  नानासाहेब घोलप, फारूक जमादार हाजी फारूक बेग, जयराज चिवटे, आयुब शेख, आदी जण उपस्थित होते यावेळी पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी शासनाकडून आलेले शिवजयंती उत्सव साजरी करण्याबाबत चे परिपत्रक वाचुन दाखवले व शासनाच्या नियमानुसार शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले.

(Advertise)

  यावेळी करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी ही शिवजयंती उत्सव शांततेत व शासनाच्या नियमास अधिन राहून साजरी केली जाईल, असे ते म्हणाले यावेळी शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी नागरिक उपस्थित होते शेवटी पोलिस शिपाई सुनील गवारी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments