उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी दोन आठवड्यापूर्वीच कोरोना लशीचा डोज घेतला होता ,मात्र डोज घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह आल्याने उस्मानाबादेत मोठा चर्चेचा विषय बनला आहे. सध्या ते होम क्वारंटाइन असून घरीच उपचार घेत आहेत. या महिन्याच्या सुरुवातील जिल्हाधिकाऱ्यांनी कोवॅक्सिन लशीचा पहिला डोस घेतला होता.
यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वारंटाइन होण्याचं व काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. जिल्हाधिकारी यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना झाल्यानंतर ही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नये यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करणार आहेत.
जिल्हाधिकारी यांना अंगात ताप असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता, त्यानुसार चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक तपासणी व उपचाराची दिशा ठरवून दिल्यानंतर ते आता विलगिकरणात आहेत.
0 Comments